Tuesday, June 16, 2009
हजारो वर्षांपासून अस्तित्वात .....
http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_1169.html
Monday, June 15, 2009
पु.ल. देशपांडे यांचा धर्मद्रोह !
हरि नरके व य.दि. फडके यांनी संपादित केलेल्या `महात्मा ज्योतिबा फुले गौरव ग्रंथा'मध्ये प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी `नामस्मरणाचा रोग' या नावाने एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी मांडलेले धर्मद्रोही विचार कालपासून रत्नागिरी येथे सुरू झालेल्या `पुलोत्सवा'च्या निमित्ताने येथे देत आहोत. व्यक्ती लौकिकदृष्ट्या कितीही मोठी असली, तरी तिने केलेला धर्मद्रोह आध्यात्मिकदृष्ट्या क्षम्य ठरत नाही. धर्मद्रोह करणे व त्याकडे दुर्लक्ष करणे, हे दोन्हीही पापच असल्याने देशपांडे यांचा धर्मद्रोह येथे मांडत आहोत.
`एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. (या जन्मी हवी तेवढी पापे करावीत, असे हिंदु धर्माने सांगितलेले नाही किंबहुना पापे करूच नयेत, असे हिंदु धर्माचे सांगणे आहे. असे असतांना देशपांडे यांनी असे म्हणणे, म्हणजे `पोटदुखीवर औषधे उपलब्ध आहेत; म्हणून माणसे वाटेल तसे खायला मोकळी असतात. त्यामुळे औषधेच नकोत', असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे ! - संपादक) त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. (कोणत्याही आजाराला शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक अशी तिन्ही प्रकारची कारणे असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. `या संघटनेपेक्षा मी जास्त विज्ञाननिष्ठ आहे', असे कोणताही विद्वान म्हणणार नाही. आजाराच्या उपरोल्लेखित तीन कारणांपैकी आध्यात्मिक कारणे जर रामाचा नामजप लिहून दूर होणार असतील अन् त्यामुळे व्यक्तीला बरे वाटणार असेल, तर देशपांडे यांनी त्यावर आक्षेप कशाकरता घेतला ? - संपादक) ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते. (अर्भकांच्या भुकेलेपणाचा एवढा कळवळा होता, तर देशपांडे यांनी ज्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे त्या अर्भकांवर ही स्थिती ओढवली आहे, त्यांना बोल लावावयास हवे होते. ऊठसूट हिंदूंच्या धर्माचरणावर घाव घालण्याचे काय कारण ? देवतांवर दुधाचा अभिषेक केल्याने विशिष्ट समाजालाच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला काय लाभ होतो, हे स्वत: साधना न करता धार्मिक कृतींचा द्वेष करणे, एवढेच ठाऊक असलेल्या देशपांडे यांच्यासारख्यांना काय कळणार ? - संपादक) एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्या जनतेला ? (राजकारणी व अन्य क्षेत्रांतील मान्यवर यांच्या वर्तनातील विसंगती दाखवतांना देशपांडे यांनी हिंदु धर्मातील धार्मिक कृती, तसेच ती करणारे पुरोहित यांच्याविषयी जी हेटाळणी करणारी भाषा वापरली आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे ! - संपादक) ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. (हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला हिंदु धर्म, त्यातील धार्मिक कृती, अत्यंत ज्ञानी असे ऋषीमुनी, त्यांची शिकवण आदी सर्वांचा त्याग करून आताच्या काळात जन्माला आलेल्या फुले यांना हिंदूंनी त्यांचे `द्रष्टे पूर्वज' मानण्याची मुळात आवश्यकताच काय ? हिंदूंनी स्वत:च्या धर्मश्रद्धांवर घाव घालणार्या फुले यांची नोंद इतिहासात `धर्मद्रोही' म्हणून करणे फुले यांच्या पाखंडी विचारांचे खंडन करून धर्मप्रबोधन करणे अधिक इष्ट होय ! - संपादक) पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. (कर्मसिद्धांत हा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या सत्य आहे, हे हिंदुद्रोहाची कावीळ झालेल्या अभ्यासशून्य देशपांडे यांना हे कसे कळणार ? - संपादक) देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. (`देव दीनांचा वाली आहे', याची अनुभूती असंख्य हिंदूंनी आतापर्यंत घेतली आहे व घेतही आहेत. असे असतांना हिंदूंनी ही गोष्ट का नाकारावी ? केवळ फुले किंवा त्यांचे समर्थक देशपांडे यांच्यासारखे धर्मद्रोही तसे सांगतात म्हणून ? - संपादक) `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. (गीतेने माणसामाणसात भेद करायला सांगितलेले नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, `मी मनुष्याच्या गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.' यावरून श्रीकृष्णाने जन्मानुसार जाती तयार केलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते. असे असतांना गीतेविषयी समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये करणारे धर्मद्रोही देशपांडे ! - संपादक) इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील. (स्वत:ला धर्मग्रंथांपेक्षाही मोठे समजणारे बौद्धिक दिवाळखोर पु.ल. देशपांडे ! `धर्मग्रंथांमध्ये चुका आहेत', असे म्हणणार्या देशपांडे यांनी किती धर्मग्रंथ किमान वाचले तरी होते ? - संपादक) आपल्या कौटुंबिक रचनेचा फेरविचार करावा लागेल.
`महाराष्ट्र भूषण' म्हणून शासनाने गौरवलेले प्रतिभावान साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची श्रीमद्भगवद्गीता व पांडुरंगावर अश्लाघ्य टीका !
`पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे, मराठीचे अप्रतिम ग्रंथ लिहिणारे प्रतिभावान साहित्यिक आहेत. शासनाने `महाराष्ट्र भूषण' म्हणून त्यांचा गौरव केला; मात्र उत्तरायुष्यात त्यांची बुद्धी भ्रमली. ते सांगतात, ``श्रीमद्भगवद्गीतेपेक्षा ज्योतिबांचे वाङ्मय निर्दोष आहे. श्रीकृष्ण हा मानवच आहे. मानवात दोष असतातच. मानव निर्दोष नाही. श्रीमद्भगवद्गीतेत मनुष्कृत पुष्कळ दोष आहेत; परंतु ज्योतिबांचे साहित्य निर्दोष आहे. (पु.लं.चे या संदर्भातील खंडन घनगर्जित अंकामध्ये आले आहे.)
पंढरपूरच्या पांडुरंगाची विलक्षण निंदा करतांना ते म्हणतात, ``हजारो वर्षे हा पंढरीचा विठोबा कटीवर हात ठेवून दीन-दलितादींचे दु:ख पहातो आहे; पण त्याच्या डोळयांतून अश्रूचा एक टिपूसही आला नाही.'' इत्यादी.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
My comments:
"एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. (या जन्मी हवी तेवढी पापे करावीत, असे हिंदु धर्माने सांगितलेले नाही किंबहुना पापे करूच नयेत, असे हिंदु धर्माचे सांगणे आहे. असे असतांना देशपांडे यांनी असे म्हणणे, म्हणजे `पोटदुखीवर औषधे उपलब्ध आहेत; म्हणून माणसे वाटेल तसे खायला मोकळी असतात. त्यामुळे औषधेच नकोत', असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे ! - संपादक"
एक गोष्ट विसरलात संपादक साहेब, की औषधामुळे पोटदुखी खरच थांबते...... जर पु.लं.चा आक्षेप असा आहे की नामस्मरण हे औषध नाही, तर काय चुकलं? तुम्हीच वाचा भरपूर ठिकाणी तुम्हाला सापडेल की नामस्मरण हे काही औषध म्हणून वापरता येण्यासारखे नाही. चुक तुमची आहे की तुम्ही असे मोकळेपणाने म्हणत नाहीत. कोणीही म्हटले की ‘अरे हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला.... ’ की पुढचे काय खरे खोटे ते न पाहता मान डोलवण्याच्या वृत्तीमुळे कोणी त्याविरुद्ध कोणी बोलण्यास धजावत नाही.
यावेळेस का नाही होत आपल्याला आठवण की...धर्मद्रोह करणे व त्याकडे दुर्लक्ष करणे, हे दोन्हीही पापच
"अर्भकांच्या भुकेलेपणाचा एवढा कळवळा होता, तर देशपांडे यांनी ज्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे त्या अर्भकांवर ही स्थिती ओढवली आहे, त्यांना बोल लावावयास हवे होते. ऊठसूट हिंदूंच्या धर्माचरणावर घाव घालण्याचे काय कारण ? "
पुन्हा आपण मुद्दा सोडून भलतीकडेच वाद सरकवला आहे......
"हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला हिंदु धर्म, त्यातील धार्मिक कृती, अत्यंत ज्ञानी असे ऋषीमुनी, त्यांची शिकवण आदी सर्वांचा त्याग करून आताच्या काळात जन्माला आलेल्या फुले यांना हिंदूंनी त्यांचे `द्रष्टे पूर्वज' मानण्याची मुळात आवश्यकताच काय ?"
..... पुन्हा सुरवात की हजारो वर्षांपासून.... अरे मुद्याला हात घाला.
"गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, `मी मनुष्याच्या गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.' यावरून श्रीकृष्णाने जन्मानुसार जाती तयार केलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते."
म्हणजे आपलेही म्हणणे आहे की जन्मानुसार जातींचा त्याग करावा.... मग कमाल आहे, की अशा धर्मद्रोहाकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
"स्वत:ला धर्मग्रंथांपेक्षाही मोठे समजणारे बौद्धिक दिवाळखोर पु.ल. देशपांडे ! `धर्मग्रंथांमध्ये चुका आहेत', असे म्हणणार्या देशपांडे यांनी किती धर्मग्रंथ किमान वाचले तरी होते ? - संपादक) "
हो, वाचले होते. तुम्ही वाचले आहेत का? सावरकरांनीही खुप अभ्यास करून लेख लिहिलेले आहेतच.
"मानवात दोष असतातच. मानव निर्दोष नाही. "
मान्य करा..... मनुष्याच्या कार्यात दुरुस्ती सुचवून ते अधिक योग्य करता येते. भगवंताचे कार्य दुरुस्तीसाठी कोणी हातात घेत नाही.
आपण खरच जर धर्मग्रंथ वाचले आहेत तर आपले या सावरकरांच्या लेखावरचे विचार कळवा:
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE
Sunday, June 7, 2009
शकुन- अपशकुन
शकुन- अपशकुन भाग १
लोकहो,
काही दिवसांपूर्वी, खरे तर काही महिन्यांपूर्वी आमच्या जातक कु. सुजाता नेहरे यांनी शकुन- अपशकुनांबद्दल आम्ही लिहावे अशी मागणी केली होती. तेव्हा आम्ही त्यांना ’हो हो’ म्हटले होते. पण शकुनांबद्दल लिहिण्याचा योग आज आला. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हे खरे आहे. असो.
भविष्यकथनात शकुनाचे खूप महत्व आहे. गुरूवर्य कृष्णमूर्तींनी शकुनाचा वापर अनेकदा भविष्यकथनासाठी केलेला आहे. "सभोवताली घडणारी प्रत्येक घटना जातकाचे भविष्य सांगत असते", या विधानाची प्रचिती वारंवार येते.
त्यामुळे ज्योतिषांने नुसतेच बारा ग्रह, बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रे आणि २४९ सब न पाहता, आजूबाजूस काय घडत आहे याकडेही लक्ष द्यावे. निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो, फक्त ते समजून घेण्याच्या जाणीवा बहुतेकांकडे नसतात.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " पैलतोगे काऊ कोकताहे... शकुन गे माये सांगताहे"
प्राचीन ग्रंथांमधून अनेक शकुन वर्णिलेले आहेत. पण त्यातील अनेक शकुन आजच्या शहरी जीवनात अनुभवास येणे दुरापास्त आहे. उदाहरणार्थ,
महत्वाच्या कामासाठी निघाले असतांना, डोईवर भरलेला पाण्याचा हंडा घेऊन एखादी सवाशिण येतांना दिसली तर कार्यसिद्धी होते.
किंवा समोरून हत्तीची अंबारी येतांना दिसली तर ते आत्यंतिक शुभ असतं. वगैरे.
आता शहरात अशा प्रकारचा अनुभव किती येईल? जवळपास अशक्यच.
त्यामुळे शकुन हे स्थलकालपरत्वे बदलत असतात. त्या त्या काळातल्या गोष्टींमधून संकेत मिळत असतात.
सभोवताली घडणार्या घटनांचा योग्य अन्वयार्थ लावता आला, तर शकुनातून देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा आपल्याला बरेच काही सुचवत असतो त्याने थक्क व्हायला होतं.
अशाच काही आजच्या काळातील शुभ आणि अपशकुनांची उदाहरणे.
आमच्या शेजारचे एक गृहस्थ एका सायंकाळी घामाघूम होऊन आमच्याकडे आले. त्यांचे पैशाचे पाकीट मिळत नव्हते. त्यात जवळजवळ अडीच हजार रुपये रोख आणि तीन बँकांची क्रेडीट कार्डे होती. ते कुठे असेल? हरवले असेल की कोणी मारले असेल? हे त्यांना उमगत नव्हते म्हणून ते आमच्याकडे आले आणि हा प्रश्न विचारला.
तेवढ्यात आमची कन्या 'स्वरांगी' तिच्या नवीन चपला घालून आम्हाला दाखवायला आमच्या कन्सलटेशनच्या खोलीत आली. आणि "बाबा, माझ्या चपला कशा आहेत?" असे आम्हाला विचारले. आम्ही हा शकुन समजून त्या गृहस्थांना त्यांच्या चपलांच्या रॅकमध्ये पाकीट शोधायला सांगितले. त्या गृहस्थांनी " काहीच्या काही सांगताय, चपलांच्या रॅकमध्ये कधी कोणी पाकीट ठेवेल का? " अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. आम्ही म्हटले, " बघून तर या ना. नाही मिळाले तर पाहू प्रश्नकुंडली मांडून." ते नाईलाजाने घरी गेले. दोन मिनिटात पाकीट हातात घेऊन परतले.
त्यांची मुलगी आणि नात त्यादिवशी त्यांच्या घरी आले होते. त्यांची नात दोन अडीच वर्षाची चिमुरडी. तिने टिपॉय वर त्यांचे पाकीट दिसले ते घेऊन त्याच्याशी काहीवेळ खेळून चपलांच्या रॅकजवळ टाकले होते.
एकदा एका जातकाची जन्मलग्नशुद्धी करत असतांना त्याचे जन्मलग्न मकर आणि कुंभेच्या एकदम संधीवरचे मिळाले. म्हणजे मकर २९ अंश ५९कला ४२ विकला. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्याच राशी. काही सेकंदाची चूक जन्मवेळेत झाली तर लग्न बदलून अख्खी पत्रिका बदलणार. रुलिंगवरून मकर लग्न असल्याचे अनुमान काढले पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती.
तेवढ्यात टिव्हीवर जो कार्यक्रम चालू होता त्यात मगर धरण्याचे दाखवत होते. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. ती मगर दिसल्यावर आमची खात्री झाली की याचे लग्न मकरच असणार. आम्ही तोच शकुन समजून मकर लग्नाची पत्रिका बनवली व त्यानुसार जातकाला त्याच्या गतआयुष्यातील काही घटनांबद्दल सांगितले. त्याने "हो हो" म्हणत त्या सर्वांना दुजोरा दिला.
एक दिवस सकाळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉक संपवून घरी परतत असता, दादरमधलाच एक मुलगा रस्त्यात भेटला. त्याला परदेशात शिकायला जायचे होते. तिथल्या युनिव्हर्सिटीतून कॉल येईल का? अशा स्वरूपाचा प्रश्न तो विचारत होता. तेवढ्यात आमचे कुलकर्णी नावाचे मित्र समोरून एका टॅक्सीतून हातात बॅग घेऊन उतरतांना दिसले.
खरे तर ते आदल्या दिवशी सायंकाळी आम्हाला ते भेटले तेव्हा, " पंत, उद्या सकाळी सातच्या खारेपाटण गाडीने गावाला जातोय" असे म्हणाले होते. आम्ही घड्याळ पाहिले. पावणेआठ वाजले होते. कुलकर्णी आल्यावर म्हणाले की, " अहो पंत तुम्हाला म्हणालो होतो की आज जाणार आहे, पण उशीर झाला उठायला. कसाबसा आवरून निघालो. पण परळ डेपोला पोहोचेपर्यंत सव्वासात झाले होते. मी पोहोचण्याच्या आधी पाच मिनिटे मुंबई - खारेपाटण एसटी, परळ डेपोतून बाहेर पडली होती."
हा शकुन समजून आम्ही त्याला सांगितले की तू दोन दिवसांनी ये. आपण कुंडली मांडू. पण तुझे जाणे कठीण आहे असे वाटते. तो पुढे आला नाही. दोन दिवसांनी त्याला बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीकडून ईमेल आला ज्यात त्याला पीएचडीचा प्रवेश नाकारला होता.
त्याचे कारण दिले होते - Unreasonable Delay.
एके दिवशी आम्ही सहकुटुंब फिरायला गेलो असतांना सौभाग्यवतींनी "लोणावळ्याला चार दिवस जाऊन येऊ" असे सांगितले. तेथे त्यांच्या कंपनीचे रेस्ट हाऊस आहे. त्याचे बुकिंग मुंबईतूनच होते. हा विषय सुरू असतांना आम्ही फूटपाथवर चालत होतो आणि बाजूला बसस्टॉप वर एक बस थांबली होती आणि कंडक्टर काही प्रवाशांना,
"अहो जागा नाहीये. मागच्या गाडीने या. उतरा खाली. "
असे सांगत होता. ते प्रवासी उतरायला तयार नव्हते असा एकंदर सीन होता. आम्ही सौभाग्यवतींना सांगितले की, " तुम्ही म्हणताय त्या दिवशी लोणावळ्याला जाता येणार नाही. कारण रेस्ट हाऊस तेव्हा भरलेले असेल."
" तुमची कायम नरपटी असते." सौभाग्यवतींचे अपेक्षित उत्तर.
दुसर्या दिवशी ऑफिसात गेल्यावर चौकशी केली. रेस्ट हाऊस "फुल" आहे असे समजले. पुढे चार आठवड्यानंतरचे बुकींग मिळाले. ( कंडक्टरने सांगितले होते - मागच्या गाडीने या.)
एक बरे झाले की आमची प्रथम संधी हुकली आणि जाणे पुढे ढकलले गेले. कारण आम्ही टायगर पॉईंटवर गेलो तेव्हा तेथे
" ए दिल बता... ये तुझे क्या हुआ.. क्यूं है तू बेकरार इतना...
कहीं प्यार ना हो जाए... कहीं प्यार ना हो जाए"
या गाण्याचे शुटिंग सुरू होते. राणी मुखर्जीचे अत्यंत जवळून दर्शन झाले. जीवन सार्थकी लागले.
लोकहो,
तुम्हीही सभोवताली घडणार्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी आणि सहस्ये उलगडतील. तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा.
लेख खूप लांबला. इथेच थांबतो.
शकुनांबद्दल उर्वरीत पुन्हा केव्हातरी.
आपला,
(शोधक) धोंडोपंत
My comment:
असंबद्ध गोष्टीचा संबध लावणे हे लॉजिकल थिंकिंग नाहीच. उदाहरणार्थ जर एखादी घटना दोन जण पाहत आहेत आणि त्यानंतर एकाला चांगला व दुसर्याला वाइट अनुभव येतो.... तर मग शकुन कसे काय मानता येइल?
अशा प्रकारचे शकुनांचे न जुळणारे खुप उदाहरणं आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलेत.
मात्र काही लोकांना फक्त जुळणारे प्रसंग अधिक लक्षात राहतात. माणसाचा स्वभावच आहे तसा. त्यामुळे सगळ्यांनी यापासून दूर राहणे योग्य.
आपल्या श्रद्धास्थानांत सावरकरही आहेत. एक निबंध येथे आहे : http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v002.pdf
जरूर वाचावा.