Friday, September 18, 2009

सावरकर द्वेषाचे खंडन

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=746320&tid=5377602820474503435&na=1&nst=1

reply on http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=746320&tid=5377602820474503435&na=3&nst=26&nid=746320-5377602820474503435-5382281315620420358

contents: (parts)
Ajinkya...savarkarkade ekhi gun navta
Sep 16 (2 days ago)Ajinkya...I CAN EXPLAIN IT
Sep 16 (2 days ago)Ajinkya...heypan tyani kela kay?he was not swatantryaveerhe was dharmveercan u add me as ur friendi can explain u
Sep 16 (2 days ago)Ajinkya...pan nantar tyanich maficha arj lihun dila britishanate jeva andmana tun sutle tyanantar tyani deshasathi kahihi kele nahityani fakt hindu dharmasathi karya keleRSS madhe rahun gandhi hatyecha kat rachlajar te secular aste tar te kadhich RSS madhe rahile nastete gandhi murder case madhil ek aaropi hoteyacha aarth asa nahi ki mi gandhi samrthak ahepan eka non secular manasala swatryaveer mhananyat kay aarth ahe?
Sep 16 (2 days ago)Ajinkya...kahi nahisarvach vichar milte julte ahetjar tasa nasta tar fakt BJP kinva RSS ka tyancha gaurav karte?congress ka karat nahi?ani dalitanvar upkar kele tari te sudha savarkarna manat nahitte babasahebana mantatmanusmruti changli ahe asa mhanare savarkar ani manusmruti jalnare ambedkarwht do u think ?dalit kunachya bajula jatil?
4:29 pm (10 hours ago)Ajinkya...mi keer ne lihilelya pustkavar vishwas thevat nahihe was a brahminand savarkar pan brahminach hote
4:30 pm (10 hours ago)Ajinkya...hindu dharmatil jatiyata nashta karta aali asti tar babasahebani kadhich dharmantar kele naste
4:38 pm (10 hours ago)Ajinkya...savarkar ambedkar mitra kay?ha ha habuddhala vishnucha avtar kela tumhimag ambedkarana savarkarcha mitra karne kay avgadh ahejya hindu sanhgtanani ambedkaran shivya dilya hotyatech aaj tyanchi puja karat ahetjust like buddhajya maharashtratil brahmanani shivaji maharjanchya rajyabhishekala viorodh kela tech aaj shivsena kadhat ahetha ha hai am not against of brahminsi just against of brahminism and hinduism
6:02 pm (8 hours ago)Ajinkya...i am against of brahminism not brahamans...
6:04 pm (8 hours ago)Ajinkya...mi savarkachya pan virodhat ahe


my reply:


@Ajinkya...
तुझे पुर्वग्रह दुषीत विचार बाजूला ठेव.
सावरकरांनी कधीच मनुस्मृतीची उगाच स्तुती केली नाही.
उलट हिंदू धर्मातल्या चुकिच्या कल्पनांना उघड विरोध केला. http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE

“buddhala vishnucha avtar kela tumhi ”
हे काय? नविनच ऐकतोय.... मला वाटतं मी हिंदू आहे जन्माने, मला माहित असावं असं काही तरी. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0
थोडक्यात, बुद्ध हिंदूंनाही पूजनीय आहेत असं सुचवायचं असेल लिहिणार्‍याला. तू कुठे वाचलंस?

“jya hindu sanhgtanani ambedkaran shivya dilya hotyatech aaj tyanchi puja karat ahet”
म्हणजेच आजचे हिंदू त्यावेळच्या थोड्याश्या आणि अजाण हिंदूंपेक्षा अधिक समज असलेले आहेत, असा अर्थ नाही का होत? आंबेडकरांनी हिंदूधर्माचा खुप फायदा करून दिला आहे. सगळ्यांना स्वपरिक्षण शिकवले आहे. तुही त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कर्माने आंबेडकर कुठल्याही ब्राह्मणापेक्षा कमी नाहीत.

“i just against of brahminism and hinduism ”
बाह्मणिज्म म्हणजे काही ब्राह्मण लोकांची सत्ता नाही. तर पुरोगामी आणि सनातनी विचार यात तारतम्य ठेवून विचार करणे आहे. आणि जसा जसा काळ बदलेल, विचारातही बदल होउ शकतो.
सावरकरांनीही सनातनी विचारात क्रांती घडवून आणली. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे काय विचार आहेत, ते वाचलेस का? नसेल तरी हरकत नाही.... पण मग त्यांच्या विचाराना तू वाइट कसे ठरवलेस हे मला कळाले नाही.
मला काही आंबेडकर आणि सावरकरांच्या मैत्रीबाबत माहिती नाही. मी काय सांगणार. पण दोघांनीही हिंदू धर्माच (अप्रत्यक्षपणे) आणि लोकांच भलं केलं.

“and savarkar pan brahminach hote ”
पण तू तर म्हणालास की तू ब्राह्मणांचा तिरस्कार करत नाहीस? मला वाटतं की फक्त म्हणालास... पण अजून मन मानत नाहीय.
माफ कर बिचार्‍या सावरकरांना, जन्म नव्हता त्यांच्या हातात.

Tuesday, June 16, 2009

हजारो वर्षांपासून अस्तित्वात .....

On article:
http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_1169.html
Monday, June 15, 2009
पु.ल. देशपांडे यांचा धर्मद्रोह !
हरि नरके व य.दि. फडके यांनी संपादित केलेल्या `महात्मा ज्योतिबा फुले गौरव ग्रंथा'मध्ये प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी `नामस्मरणाचा रोग' या नावाने एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी मांडलेले धर्मद्रोही विचार कालपासून रत्‍नागिरी येथे सुरू झालेल्या `पुलोत्सवा'च्या निमित्ताने येथे देत आहोत. व्यक्‍ती लौकिकदृष्ट्या कितीही मोठी असली, तरी तिने केलेला धर्मद्रोह आध्यात्मिकदृष्ट्या क्षम्य ठरत नाही. धर्मद्रोह करणे व त्याकडे दुर्लक्ष करणे, हे दोन्हीही पापच असल्याने देशपांडे यांचा धर्मद्रोह येथे मांडत आहोत.
`एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. (या जन्मी हवी तेवढी पापे करावीत, असे हिंदु धर्माने सांगितलेले नाही किंबहुना पापे करूच नयेत, असे हिंदु धर्माचे सांगणे आहे. असे असतांना देशपांडे यांनी असे म्हणणे, म्हणजे `पोटदुखीवर औषधे उपलब्ध आहेत; म्हणून माणसे वाटेल तसे खायला मोकळी असतात. त्यामुळे औषधेच नकोत', असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे ! - संपादक) त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. (कोणत्याही आजाराला शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक अशी तिन्ही प्रकारची कारणे असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. `या संघटनेपेक्षा मी जास्त विज्ञाननिष्ठ आहे', असे कोणताही विद्वान म्हणणार नाही. आजाराच्या उपरोल्लेखित तीन कारणांपैकी आध्यात्मिक कारणे जर रामाचा नामजप लिहून दूर होणार असतील अन् त्यामुळे व्यक्‍तीला बरे वाटणार असेल, तर देशपांडे यांनी त्यावर आक्षेप कशाकरता घेतला ? - संपादक) ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते. (अर्भकांच्या भुकेलेपणाचा एवढा कळवळा होता, तर देशपांडे यांनी ज्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे त्या अर्भकांवर ही स्थिती ओढवली आहे, त्यांना बोल लावावयास हवे होते. ऊठसूट हिंदूंच्या धर्माचरणावर घाव घालण्याचे काय कारण ? देवतांवर दुधाचा अभिषेक केल्याने विशिष्ट समाजालाच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला काय लाभ होतो, हे स्वत: साधना न करता धार्मिक कृतींचा द्वेष करणे, एवढेच ठाऊक असलेल्या देशपांडे यांच्यासारख्यांना काय कळणार ? - संपादक) एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्‍न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्‍या जनतेला ? (राजकारणी व अन्य क्षेत्रांतील मान्यवर यांच्या वर्तनातील विसंगती दाखवतांना देशपांडे यांनी हिंदु धर्मातील धार्मिक कृती, तसेच ती करणारे पुरोहित यांच्याविषयी जी हेटाळणी करणारी भाषा वापरली आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे ! - संपादक) ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. (हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला हिंदु धर्म, त्यातील धार्मिक कृती, अत्यंत ज्ञानी असे ऋषीमुनी, त्यांची शिकवण आदी सर्वांचा त्याग करून आताच्या काळात जन्माला आलेल्या फुले यांना हिंदूंनी त्यांचे `द्रष्टे पूर्वज' मानण्याची मुळात आवश्यकताच काय ? हिंदूंनी स्वत:च्या धर्मश्रद्धांवर घाव घालणार्‍या फुले यांची नोंद इतिहासात `धर्मद्रोही' म्हणून करणे फुले यांच्या पाखंडी विचारांचे खंडन करून धर्मप्रबोधन करणे अधिक इष्ट होय ! - संपादक) पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. (कर्मसिद्धांत हा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या सत्य आहे, हे हिंदुद्रोहाची कावीळ झालेल्या अभ्यासशून्य देशपांडे यांना हे कसे कळणार ? - संपादक) देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. (`देव दीनांचा वाली आहे', याची अनुभूती असंख्य हिंदूंनी आतापर्यंत घेतली आहे व घेतही आहेत. असे असतांना हिंदूंनी ही गोष्ट का नाकारावी ? केवळ फुले किंवा त्यांचे समर्थक देशपांडे यांच्यासारखे धर्मद्रोही तसे सांगतात म्हणून ? - संपादक) `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्‍या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. (गीतेने माणसामाणसात भेद करायला सांगितलेले नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, `मी मनुष्याच्या गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.' यावरून श्रीकृष्णाने जन्मानुसार जाती तयार केलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते. असे असतांना गीतेविषयी समाजाची दिशाभूल करणारी वक्‍तव्ये करणारे धर्मद्रोही देशपांडे ! - संपादक) इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील. (स्वत:ला धर्मग्रंथांपेक्षाही मोठे समजणारे बौद्धिक दिवाळखोर पु.ल. देशपांडे ! `धर्मग्रंथांमध्ये चुका आहेत', असे म्हणणार्‍या देशपांडे यांनी किती धर्मग्रंथ किमान वाचले तरी होते ? - संपादक) आपल्या कौटुंबिक रचनेचा फेरविचार करावा लागेल.
`महाराष्ट्र भूषण' म्हणून शासनाने गौरवलेले प्रतिभावान साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची श्रीमद्‌भगवद्‌गीता व पांडुरंगावर अश्लाघ्य टीका !
`पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे, मराठीचे अप्रतिम ग्रंथ लिहिणारे प्रतिभावान साहित्यिक आहेत. शासनाने `महाराष्ट्र भूषण' म्हणून त्यांचा गौरव केला; मात्र उत्तरायुष्यात त्यांची बुद्धी भ्रमली. ते सांगतात, ``श्रीमद्‌भगवद्‍गीतेपेक्षा ज्योतिबांचे वाङ्मय निर्दोष आहे. श्रीकृष्ण हा मानवच आहे. मानवात दोष असतातच. मानव निर्दोष नाही. श्रीमद्‌भगवद्‍गीतेत मनुष्कृत पुष्कळ दोष आहेत; परंतु ज्योतिबांचे साहित्य निर्दोष आहे. (पु.लं.चे या संदर्भातील खंडन घनगर्जित अंकामध्ये आले आहे.)
पंढरपूरच्या पांडुरंगाची विलक्षण निंदा करतांना ते म्हणतात, ``हजारो वर्षे हा पंढरीचा विठोबा कटीवर हात ठेवून दीन-दलितादींचे दु:ख पहातो आहे; पण त्याच्या डोळयांतून अश्रूचा एक टिपूसही आला नाही.'' इत्यादी.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


My comments:


"एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. (या जन्मी हवी तेवढी पापे करावीत, असे हिंदु धर्माने सांगितलेले नाही किंबहुना पापे करूच नयेत, असे हिंदु धर्माचे सांगणे आहे. असे असतांना देशपांडे यांनी असे म्हणणे, म्हणजे `पोटदुखीवर औषधे उपलब्ध आहेत; म्हणून माणसे वाटेल तसे खायला मोकळी असतात. त्यामुळे औषधेच नकोत', असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे ! - संपादक"
एक गोष्ट विसरलात संपादक साहेब, की औषधामुळे पोटदुखी खरच थांबते...... जर पु.लं.चा आक्षेप असा आहे की नामस्मरण हे औषध नाही, तर काय चुकलं? तुम्हीच वाचा भरपूर ठिकाणी तुम्हाला सापडेल की नामस्मरण हे काही औषध म्हणून वापरता येण्यासारखे नाही. चुक तुमची आहे की तुम्ही असे मोकळेपणाने म्हणत नाहीत. कोणीही म्हटले की ‘अरे हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला.... ’ की पुढचे काय खरे खोटे ते न पाहता मान डोलवण्याच्या वृत्तीमुळे कोणी त्याविरुद्ध कोणी बोलण्यास धजावत नाही.
यावेळेस का नाही होत आपल्याला आठवण की...धर्मद्रोह करणे व त्याकडे दुर्लक्ष करणे, हे दोन्हीही पापच
"अर्भकांच्या भुकेलेपणाचा एवढा कळवळा होता, तर देशपांडे यांनी ज्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे त्या अर्भकांवर ही स्थिती ओढवली आहे, त्यांना बोल लावावयास हवे होते. ऊठसूट हिंदूंच्या धर्माचरणावर घाव घालण्याचे काय कारण ? "
पुन्हा आपण मुद्दा सोडून भलतीकडेच वाद सरकवला आहे......

"हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला हिंदु धर्म, त्यातील धार्मिक कृती, अत्यंत ज्ञानी असे ऋषीमुनी, त्यांची शिकवण आदी सर्वांचा त्याग करून आताच्या काळात जन्माला आलेल्या फुले यांना हिंदूंनी त्यांचे `द्रष्टे पूर्वज' मानण्याची मुळात आवश्यकताच काय ?"
..... पुन्हा सुरवात की हजारो वर्षांपासून.... अरे मुद्याला हात घाला.
"गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, `मी मनुष्याच्या गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.' यावरून श्रीकृष्णाने जन्मानुसार जाती तयार केलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते."
म्हणजे आपलेही म्हणणे आहे की जन्मानुसार जातींचा त्याग करावा.... मग कमाल आहे, की अशा धर्मद्रोहाकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?

"स्वत:ला धर्मग्रंथांपेक्षाही मोठे समजणारे बौद्धिक दिवाळखोर पु.ल. देशपांडे ! `धर्मग्रंथांमध्ये चुका आहेत', असे म्हणणार्‍या देशपांडे यांनी किती धर्मग्रंथ किमान वाचले तरी होते ? - संपादक) "
हो, वाचले होते. तुम्ही वाचले आहेत का? सावरकरांनीही खुप अभ्यास करून लेख लिहिलेले आहेतच.
"मानवात दोष असतातच. मानव निर्दोष नाही. "
मान्य करा..... मनुष्याच्या कार्यात दुरुस्ती सुचवून ते अधिक योग्य करता येते. भगवंताचे कार्य दुरुस्तीसाठी कोणी हातात घेत नाही.
आपण खरच जर धर्मग्रंथ वाचले आहेत तर आपले या सावरकरांच्या लेखावरचे विचार कळवा:
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE

Sunday, June 7, 2009

शकुन- अपशकुन

On article : http://dhondopant.blogspot.com/2009/05/blog-post_29.html

शकुन- अपशकुन भाग १

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

काही दिवसांपूर्वी, खरे तर काही महिन्यांपूर्वी आमच्या जातक कु. सुजाता नेहरे यांनी शकुन- अपशकुनांबद्दल आम्ही लिहावे अशी मागणी केली होती. तेव्हा आम्ही त्यांना ’हो हो’ म्हटले होते. पण शकुनांबद्दल लिहिण्याचा योग आज आला. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हे खरे आहे. असो.

भविष्यकथनात शकुनाचे खूप महत्व आहे. गुरूवर्य कृष्णमूर्तींनी शकुनाचा वापर अनेकदा भविष्यकथनासाठी केलेला आहे. "सभोवताली घडणारी प्रत्येक घटना जातकाचे भविष्य सांगत असते", या विधानाची प्रचिती वारंवार येते.

त्यामुळे ज्योतिषांने नुसतेच बारा ग्रह, बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रे आणि २४९ सब न पाहता, आजूबाजूस काय घडत आहे याकडेही लक्ष द्यावे. निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो, फक्त ते समजून घेण्याच्या जाणीवा बहुतेकांकडे नसतात.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " पैलतोगे काऊ कोकताहे... शकुन गे माये सांगताहे"

प्राचीन ग्रंथांमधून अनेक शकुन वर्णिलेले आहेत. पण त्यातील अनेक शकुन आजच्या शहरी जीवनात अनुभवास येणे दुरापास्त आहे. उदाहरणार्थ,

महत्वाच्या कामासाठी निघाले असतांना, डोईवर भरलेला पाण्याचा हंडा घेऊन एखादी सवाशिण येतांना दिसली तर कार्यसिद्धी होते.

किंवा समोरून हत्तीची अंबारी येतांना दिसली तर ते आत्यंतिक शुभ असतं. वगैरे.

आता शहरात अशा प्रकारचा अनुभव किती येईल? जवळपास अशक्यच.

त्यामुळे शकुन हे स्थलकालपरत्वे बदलत असतात. त्या त्या काळातल्या गोष्टींमधून संकेत मिळत असतात.

सभोवताली घडणार्‍या घटनांचा योग्य अन्वयार्थ लावता आला, तर शकुनातून देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा आपल्याला बरेच काही सुचवत असतो त्याने थक्क व्हायला होतं.

अशाच काही आजच्या काळातील शुभ आणि अपशकुनांची उदाहरणे.

आमच्या शेजारचे एक गृहस्थ एका सायंकाळी घामाघूम होऊन आमच्याकडे आले. त्यांचे पैशाचे पाकीट मिळत नव्हते. त्यात जवळजवळ अडीच हजार रुपये रोख आणि तीन बँकांची क्रेडीट कार्डे होती. ते कुठे असेल? हरवले असेल की कोणी मारले असेल? हे त्यांना उमगत नव्हते म्हणून ते आमच्याकडे आले आणि हा प्रश्न विचारला.

तेवढ्यात आमची कन्या 'स्वरांगी' तिच्या नवीन चपला घालून आम्हाला दाखवायला आमच्या कन्सलटेशनच्या खोलीत आली. आणि "बाबा, माझ्या चपला कशा आहेत?" असे आम्हाला विचारले. आम्ही हा शकुन समजून त्या गृहस्थांना त्यांच्या चपलांच्या रॅकमध्ये पाकीट शोधायला सांगितले. त्या गृहस्थांनी " काहीच्या काही सांगताय, चपलांच्या रॅकमध्ये कधी कोणी पाकीट ठेवेल का? " अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. आम्ही म्हटले, " बघून तर या ना. नाही मिळाले तर पाहू प्रश्नकुंडली मांडून." ते नाईलाजाने घरी गेले. दोन मिनिटात पाकीट हातात घेऊन परतले.

त्यांची मुलगी आणि नात त्यादिवशी त्यांच्या घरी आले होते. त्यांची नात दोन अडीच वर्षाची चिमुरडी. तिने टिपॉय वर त्यांचे पाकीट दिसले ते घेऊन त्याच्याशी काहीवेळ खेळून चपलांच्या रॅकजवळ टाकले होते.

एकदा एका जातकाची जन्मलग्नशुद्धी करत असतांना त्याचे जन्मलग्न मकर आणि कुंभेच्या एकदम संधीवरचे मिळाले. म्हणजे मकर २९ अंश ५९कला ४२ विकला. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्याच राशी. काही सेकंदाची चूक जन्मवेळेत झाली तर लग्न बदलून अख्खी पत्रिका बदलणार. रुलिंगवरून मकर लग्न असल्याचे अनुमान काढले पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती.

तेवढ्यात टिव्हीवर जो कार्यक्रम चालू होता त्यात मगर धरण्याचे दाखवत होते. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. ती मगर दिसल्यावर आमची खात्री झाली की याचे लग्न मकरच असणार. आम्ही तोच शकुन समजून मकर लग्नाची पत्रिका बनवली व त्यानुसार जातकाला त्याच्या गतआयुष्यातील काही घटनांबद्दल सांगितले. त्याने "हो हो" म्हणत त्या सर्वांना दुजोरा दिला.

एक दिवस सकाळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉक संपवून घरी परतत असता, दादरमधलाच एक मुलगा रस्त्यात भेटला. त्याला परदेशात शिकायला जायचे होते. तिथल्या युनिव्हर्सिटीतून कॉल येईल का? अशा स्वरूपाचा प्रश्न तो विचारत होता. तेवढ्यात आमचे कुलकर्णी नावाचे मित्र समोरून एका टॅक्सीतून हातात बॅग घेऊन उतरतांना दिसले.

खरे तर ते आदल्या दिवशी सायंकाळी आम्हाला ते भेटले तेव्हा, " पंत, उद्या सकाळी सातच्या खारेपाटण गाडीने गावाला जातोय" असे म्हणाले होते. आम्ही घड्याळ पाहिले. पावणेआठ वाजले होते. कुलकर्णी आल्यावर म्हणाले की, " अहो पंत तुम्हाला म्हणालो होतो की आज जाणार आहे, पण उशीर झाला उठायला. कसाबसा आवरून निघालो. पण परळ डेपोला पोहोचेपर्यंत सव्वासात झाले होते. मी पोहोचण्याच्या आधी पाच मिनिटे मुंबई - खारेपाटण एसटी, परळ डेपोतून बाहेर पडली होती."

हा शकुन समजून आम्ही त्याला सांगितले की तू दोन दिवसांनी ये. आपण कुंडली मांडू. पण तुझे जाणे कठीण आहे असे वाटते. तो पुढे आला नाही. दोन दिवसांनी त्याला बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीकडून ईमेल आला ज्यात त्याला पीएचडीचा प्रवेश नाकारला होता.

त्याचे कारण दिले होते - Unreasonable Delay.

एके दिवशी आम्ही सहकुटुंब फिरायला गेलो असतांना सौभाग्यवतींनी "लोणावळ्याला चार दिवस जाऊन येऊ" असे सांगितले. तेथे त्यांच्या कंपनीचे रेस्ट हाऊस आहे. त्याचे बुकिंग मुंबईतूनच होते. हा विषय सुरू असतांना आम्ही फूटपाथवर चालत होतो आणि बाजूला बसस्टॉप वर एक बस थांबली होती आणि कंडक्टर काही प्रवाशांना,

"अहो जागा नाहीये. मागच्या गाडीने या. उतरा खाली. "

असे सांगत होता. ते प्रवासी उतरायला तयार नव्हते असा एकंदर सीन होता. आम्ही सौभाग्यवतींना सांगितले की, " तुम्ही म्हणताय त्या दिवशी लोणावळ्याला जाता येणार नाही. कारण रेस्ट हाऊस तेव्हा भरलेले असेल."

" तुमची कायम नरपटी असते." सौभाग्यवतींचे अपेक्षित उत्तर.

दुसर्‍या दिवशी ऑफिसात गेल्यावर चौकशी केली. रेस्ट हाऊस "फुल" आहे असे समजले. पुढे चार आठवड्यानंतरचे बुकींग मिळाले. ( कंडक्टरने सांगितले होते - मागच्या गाडीने या.)

एक बरे झाले की आमची प्रथम संधी हुकली आणि जाणे पुढे ढकलले गेले. कारण आम्ही टायगर पॉईंटवर गेलो तेव्हा तेथे

" ए दिल बता... ये तुझे क्या हुआ.. क्यूं है तू बेकरार इतना...
कहीं प्यार ना हो जाए... कहीं प्यार ना हो जाए"

या गाण्याचे शुटिंग सुरू होते. राणी मुखर्जीचे अत्यंत जवळून दर्शन झाले. जीवन सार्थकी लागले.

लोकहो,

तुम्हीही सभोवताली घडणार्‍या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी आणि सहस्ये उलगडतील. तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा.

लेख खूप लांबला. इथेच थांबतो.

शकुनांबद्दल उर्वरीत पुन्हा केव्हातरी.

आपला,
(शोधक) धोंडोपंत

---

My comment:

असंबद्ध गोष्टीचा संबध लावणे हे लॉजिकल थिंकिंग नाहीच. उदाहरणार्थ जर एखादी घटना दोन जण पाहत आहेत आणि त्यानंतर एकाला चांगला व दुसर्‍याला वाइट अनुभव येतो.... तर मग शकुन कसे काय मानता येइल?
अशा प्रकारचे शकुनांचे न जुळणारे खुप उदाहरणं आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलेत.
मात्र काही लोकांना फक्त जुळणारे प्रसंग अधिक लक्षात राहतात. माणसाचा स्वभावच आहे तसा. त्यामुळे सगळ्यांनी यापासून दूर राहणे योग्य.
आपल्या श्रद्धास्थानांत सावरकरही आहेत. एक निबंध येथे आहे : http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v002.pdf
जरूर वाचावा.

Saturday, May 16, 2009

एअरपोर्ट सिक्युरिटी

On article: http://kayvatelte.wordpress.com/2009/05/15/एअरपोर्ट-सिक्युरिटी

एअरपोर्ट सिक्युरिटी.
आज सकाळी मुंबईहुन नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेशभाई होता. तो सकाळी वापीहुन आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापी हुन). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणुन त्याने आपली कार आण्यायची आणि मग आधी मला पिक अप करुन एअर्पोर्ट ला जायचं . आम्हाला ड्रॉप केलं की त्याचा ड्रायव्हर गाडी माझ्या घरी पार्क करेल, आणि मग संध्याकाळी परत मुंबईला पोहोचल्यावर दिनेश भाई कार घेउन जाइल..
कसलं जबरी प्लानिंग केलंय ?? नाही कां? अहो इतका विचार जर आपल्या कामाच्या बाबतिल केला तर टर्न ओव्हर दुप्पट वाढेल. पण तसं होत नाही नां… हीच तर खरी शोकांतिका आहे. असो..
तर एअर्पोर्ट ला पोहोचल्यावर चेक इन बॅगेज टाकलं आणि आम्ही हात हलवत इकडे तिकडे फिरत होतो. दिनेश म्हणे.. प्रॉपर युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस असायला पाहिजे. पण तेच जमत नाही. जर ते जमलं तर मात्र भरपुर पैसा वाचु शकेल, एक माणुस जास्त काम करु शकेल. म्हंटलं.. अरे भाई.. जरा होश मे आओ.. आज साला तुम्हारे पास काम नही है तो आदमी को भगादोगे, बादमे जब जरुरत पडेगी तो आदमी कहांसे पैदा करोगे? ईतने स्किल्ड आदमी जो तुम्हारे पास है , दस सालोसे, उनकॊ इतनी आसानिसे छोड दोगे?? अगर ऐसा करोगे, तो इट्स द मोस्ट फुलिश डिसिजन यु विल बी टेकिंग…!
म्हंटलं दिनेश भाई , युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस जर पहायचे असतिल तर त्या मद्राशाकडे पहा.आमच्या समोरंच एक मद्रासी उभा होता. स्वच्छ पांढरा शर्ट, काळी पॅंट, गळ्यामधे एअरपोर्ट ऍथोरिटीने दिलेला आय कार्ड… चेहेऱ्यावर एक वेगळाच उर्मटपणा..ह्या मद्रासी लोकांचा चहा आणि कापी वर अगदी एकाधिकार आहे. हा फोटॊ बघा
ट्रॉली – एअरपोर्ट ऑथॉरिटी ची, ह्याचं इनव्हेस्टमेंट फक्त दोन थर्मास आणि चहाचे कप. बरं, एअरपोर्टवर आत येण्यासाठी लागणारा पास पण ह्याच्या गळ्यात लटकत आहे, म्हणजे नक्कीच ह्याने एअरपोर्ट ऑथॉरिटी च्या सिक्युरीटीचे किंवा प्रॉपर माणसाचे पाम ग्रिसिंग केलेले असावेत. जो चहा बाहेर सायकलवरचा भैय्या ( मुंबईकरांना माहिती असेल, की भल्या पहाटे कांही भैये लोकं सायकलवर चहाची किटली ठेउन चहाचा/कॉफिचा धंदा करतात) ५ रुपयात विकतो, त्याच क्वॉलिटीचा चहा हा मद्राशी भैय्या १५ रुपयात विकतो. याला म्हणतात बेस्ट युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस…असं काही तरी करा !
हे सिक्युरिटी वाले आपल्या सारख्या सामान्य प्रवाशाला किती छळतात? समजा पाण्याची जरी बाटली असली तरी पाणी पिउन दाखवा म्हणतात. बरं हे तर सोडाच, ह्यांचा हलकट पणा इथेच संपत नाही, तर लहान मुलाचं दुध असेल, तर त्याच्या आइला ते पण पिउन दाखवायला लावतात हे निर्लज्ज सिक्युरिटी वाले—
आणि मग या मद्राशाला कसा काय तो पास मिळाला असेल? कोणी त्याला परमिशन दिली असेल? म्हणजे मुंबई एअरपोर्टचे अधिकारी+ सिक्युरिटी ह्या दोघांनाही त्याने चांगले पैसे खाउ घातले असतिल म्हणुन त्याला असा एक्स्लुझिव धंदा करण्याचा परवाना मिळाला असावा एअरपोर्ट मधे.
राजकोट एअरपोर्टवरच्या ह्या सिक्युरिटी वाले तर अशा तर्हेने तपासतात, जसे कांही तुम्ही स्पेस शिपमधेच बसायला चालले आहात. लॅप टॉप असेल तर त्यांच्या कडे एक मोठा ट्रे असतो, त्या ट्रे मधे तुमचा लॅपटॉप काढुन त्या ट्रे मधे ठेवायचा. आणि रिकामी बॅग त्या एक्स रे मधुन पास करायची. असा मुर्खपणा त्यांना कोणी आणि कां करायला सांगितला आहे ते कळत नाही. तुमची लॅपटॉप्ची बॅग ही रेक्झिन ची किंवा लेदरची असते, त्या मधुन एक्स रे सरळ पास होऊ शकतात.. पण नाही.. ह्या निर्बुध्द लोकांना ते कोण सांगणार?
बरं ह्यांचे नियम एअरपोर्ट गणिक बदलतात. म्हणजे जे कांहि सिक्युरिटी च्या नावाखाली राजकोटला करतात, ते नागपुरला करतात असे नाही , किंवा अहमदाबादला जे हॅंड बॅगेज मधे चालतं ते भुजला चालेल असं नाही. प्रत्येक ठिकाणचा तो ठोंब्या सिक्युरिटीवाला आपल्याला वाटेल तसे नियम बनवतो.
परवाचीच गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात मी नागपुरला आलो होतो . इथुन परत जातांना आईने मला आवडतं म्हणून कच्च्या फणसाचं आणी कैरी चं मिक्स लोणचं दिलं होतं. मी विचार केला, की जर हे चेक इन बॅगेज मधे टाकलं, तर कदाचित बाटली फुटेल. म्हणुन ते हॅंड बॅगेज मधे ठेवलं. सिक्युरिटीच्या वेळी त्या माणसानी अडवलं मला, म्हणे आप नहीं ले जा सकते ये चिज? म्हंट्लं क्यो? तर म्हणे इसमे तेल है, और तेल अलाउड नही है फ्लाइटमे. मी त्याला सांगुन पाहिलं की मुंबईहुन येतांना मी एक मुंबईचं लोणचं इथे आणलं होतं.. तर म्हणे वहांका कानुन अलग है.. !!!
या मुर्ख आणि अशिक्षित लोकांशी जास्त वाद घालण्यात काहिंच फायदा नसतो. बरेचसे लोकं मग आपल्या हॅंडबॅगेजमधले, शेव्हिंग क्रिम्स, डिओडॊरंट्स, आणि इतर तरल पदार्थ काढुन तिथे टाकुन देतात. मला तर अगदी दाट संशय आहे, की हे पॅसेंजर्स कडुन काढुन घेतलेले सामान नंतर हा सिक्युरिटी स्टाफ वाटुन घेत असेल. नाही तर यांची लायकी आहे का फ्रेंच पर्फ्युम वापरायची? नक्कीच एखाद्या पॅसेंजरचा ढापलेला असेल तो…..!
एखादा पॅसेंजर जर इटरनॅशनल फ्लाइटने आला असेल तर त्याच्या हॅंडबॅगेजमधंल बरंच सामान हे लोकं सिक्युरिटीच्या नियमाखाली काढुन घेतात. त्यांचे खास बकरे असतात हे बाहेरुन आलेले . तो पॅसेंजर मग अगदी जीव तोडुन सांगत असतो, भैय्या , मै ये अमेरिकासे हँडबॅगेज मे लाया है. इसमे कुछ नहीं है.. पण ह्यांच्या चेहेऱ्यावरची रेष पण हलेल तर शपथ! हे म्हणतात, इंडियामे नही चलता है ये हॅंड बॅगेज मे.आणि मग त्याला सांगितलं जाते की आप ये चेक इन बॅगेजमे डाल दो.. बरेच लोकं मग ते सगळं सामान चरफर्डत तिथेच डस्ट बिन मधे टाकतात.. भिकाऱ्यांची जशी कटोरी तशी या सिक्युरिटी वाल्यांचं भिक मागायचं मोठ्ठं भांडं म्हणजे ती मोठ्ठी डस्ट बिन.. त्याला खरंच डस्ट बिन म्हणायचं कां?? बरं कस्टम मधे काय होतं त्यावर एक वेगळा लेख होईल.
जगामधे कांही लोकं असे आहेत की ज्यांचा मी अगदी मनापासुन तिरस्कार करतो, त्यापैकी हे खाकी कपडे वाले! बरं तुम्हाला आणि आम्हाला इतका त्रास देणारे हे लोकं , एखादा मंत्री आला, की त्याला सरळ सॅलुट करुन जाउ देतात. मग तेंव्हा सिक्युरिटीचं काय होतं? बरेचदा, लहान एअरपोर्टवर त्या मंत्र्या बरोबर त्याचे चमचे अगदी आतपर्यंत येतात त्याला सोडायला.. ते कसं चालतं? आणि कुठल्या नियमात बसतं ते??
गुजराथ मधे एक अंजार नावाची जागा आहे. इथे तलवारी , चाकू इत्यादी वस्तु तयार होतात. त्याला सुंदरशी पितळेची मुठ असते, छान लाल मॅन असतं.. मी एकदा सहज म्हणुन तलवारी घेतल्या दोन विकत, म्हंट्लं, की छान शो पिस आहेत. चेक इन ला टाकलं बॅगेज, तर तिथे मला म्हणतो, अलाउड नहीं है.. मला जरा रागंच आला, त्याला म्हणालो, ऐसा कहां लिखा है की चेक इन बॅगेजमे तलवार अलाउड नही ं है? मोठ्या मुश्किलिने सोडलं त्याने मला.
कांही वर्षांपुर्वी, अजुन एक फार्स होता इंडियन एअरलाइन्स चा. तुमचं चेक इन केलेलं बॅगेज, ते लोकं बाहेर एका रांगेत मांडुन ठेवायचे नागपुर एअरपोर्ट ला, आणि मग तुम्ही सिक्युरिटी मधुन पास झाल्यावर ते तुम्ही आयडॆंटीफाय करायचं, मग एक सिक्युरिटीवाला त्या टॅग वर क्रॉस करेल आणि मग ते बॅगेज विमानात चढवले जाईल. हा फार्स फक्त इंडियन एअरलाइन्सचे लोकंच करायचे, जेट ने तुम्ही जात असाल ,तर या प्रोसिजरची गरज नसायची?
तुमचे अनुभव .. एअरपोर्ट सिक्युरिटीच्या बाबतितले तुम्ही इथे कॉमेंट्स मधे पोस्ट करु शकता..
मला नेहेमी पडणारा प्रशन.. जेट आणी इतर एअरलाइन्सची सिक्युरिटी वेगळी कशी?? आणि कां? जाउ द्या.. आलिया भोगासी असावे सादरं, चित्ती असु द्यावे समाधानं!


My Comments:


महेंद्र,
मला वाटतं, तुमचा दृष्टीकोन बराच चुकीचा आहे. अनेक ठिकाणी अजाणतेपणी तुम्ही सिक्युरिटी स्टाफचा दुस्वास करीत आहात.
काही ठिकाणी अपवादात्मक असे लोकं असतील (उदा. अंजार चा अनुभव) जिथे काहीबाही सांगुन वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण आता अधिकाधीक ठिकाणी नियम सारखे आहेत. काही नियम नुकतेच बदललेले आहेत. ते का याबद्दलही अनेक बातम्या दिल्या होत्या. जे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्यांना शिव्या घालून काय साध्य होईल ?
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवासापूर्वी सगळे नियम माहिती करून घेणे. कारण यात वारंवार बदल होउ शकतात. जे नियम बदलतात त्यात काही वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल की काही ठिकाणी वेगळे नियम काही ठिकाणी वेगळे….. कारण, कर्मचार्‍यांनाच सुचना व प्रशिक्षण देण्याची वेळ व पद्धत व बदलाबत प्रवाश्यांना माहिती नसणे, ई.
लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक व धातूच्या वस्तू बाजूला का काढाव्या, हे एव्हाना कळलं असावं… नसेल तर इमेल वर आपण संपर्क करूयात.
द्रव वस्तू अगदी लहान मुलांसाठी असल्या तरी त्याची खात्री करून घेणे केव्हाही योग्य. ’लहान मुलाचं दुध असेल, तर त्याच्या आइला ते पण पिउन दाखवायला लावतात’ तर यात आईला कशाबद्दल लाज वाटली पाहिजे? आई तर नेहमी तापमान वगैरे तपासून पहात असतेच, तर मग थोडं प्यावं लागलं तर त्यात वाईट काय?
कस्टम हे सिक्य़ुरिटीपेक्षा वेगळे आहेत, आणि मला जास्त अनुभव नसल्यामुळे कदाचित आपलं म्हणण योग्य असेल.
सिक्युरिटीचे नियम मला योग्य वाटतात आणि सगळ्यांनी त्याबद्दल माहिती ठेवावी व पाळावेत. शेवटी सर्वसामान्य माणसाने नियम चुकविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला, तर त्याचा फायदा वाइट लोकं घेऊ शकतात हे समजून योग्य रितीने वागावं.


Tuesday, April 21, 2009

खटला सुरू झाला - Dilip Khapre

On article : http://www.khapre.org/blog/marathi/2009/04/blog-post_19.aspx

अखेर अजमल कसाबचा खटला सुरू झाला आहे. ज्या माणसाने गोळीबार करताना मिडीयाने पुन्हा पुन्हा दाखविले, माणसांचे मुडदे पाडताना करोडो लोकांनी त्याला पाहिले अशा गुन्हेगारावर खटला चालू आहे. काय लोकशाहीची दुर्दशा ! न्यायालयात जेव्हा खुनाचा खटला चालू असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्‍या साक्षीदारावर विश्वास ठेउन कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देते, आणि इथे तर T.V. वर प्रत्यक्ष देशाने पाहिलेले असताना त्या कसाबवर खटला चालवावा म्हणजे काय?
आता त्याला न्यायालय सर्व संधी देणार. वर्तमानपत्रात त्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर अंदाज तरी करता येईल काय, किती खर्च येत असेल ते. आपण उलटा विचार करू यात असे पाकिस्तानात घडले असते तर काय पाकिस्तानने लाड पुरवले असते काय? अरे कसला खटला चालवता त्याला दाखवा तो कसा गोळीबार करतो ते आणि हाच पुरावा ग्राह्य धरून द्या ना त्याला जाहीर जाहीर फाशी, मग कोणीही माईचा लाल यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. द्या त्या अफझल गुरूला जनतेच्या हवाली करून, मग बघा जनता त्याचा काय न्याय करते ते.
कसाब काय तक्रार करतो, जग काय म्हणेल, पाकिस्तानचे संबंध कसे राहतील याच काय विचार करायचा? बंदूक चालवताना त्याने विचार केला होता? त्याने किती कुटुंबांना निराधार केले आहे, त्यांनी काय करावे. काय भारताची घटना आहे, ज्याने खुले आम, ज्यांचा कुठलाही गुन्हा किंवा दोष नसताना, दीडेकशे माणसांचे मुडदे पाडले, जे सर्व भारताने पाहिले, त्याला कायदा संरक्षण देतो, न्यायाची संधी देतो आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेतो, मोठी चेष्टा आहे.
आपण जगाला काय दाखवायचे की, आम्ही किती न्यायप्रिय आहोत, भले मग आमच्या निष्पाप जनतेवर कोणीही कसाही गोळीबार करावा. काय न्याय मिळणार आहे त्या कर्तबगार अधिकार्‍यांना, काय न्याय मिळणार आहे त्या कुटुंबीयांना, आपण त्यांना न्याय नाकारतो आहोत, त्या कसाबाला न्याय देताना याचे भान सर्वजण विसरलेत.
लोकसभेला मते मागणारे, जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत, पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार आहे.



My comment:



दिलिप,
मला वाटते की तुम्ही स्वात मधे जाऊन रहाण्यास अत्यंत लायक आहात. तिथे ही विशेष कोणाचे ऐकून न घेता शिक्षा करत सूटतात.
होय, कसावला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. पण, जर तुम्ही ज्या देशाचे कायदे करण्यात भाग घेत नसाल, तर असा घोळ कायमच घातला जाईल.
करा ना कायदा की कसावला लोकांच्यात फेकून देण्यात यावे. जाहीर फाशी द्यावी. मी तुम्हाला पूर्ण पाठींबा देइन. पोलिस किंवा राजकारण्यांकडून तुम्ही नक्की काय अपेक्षा करताय? आणि नेहमी काय करत रहाव अस म्हणताय ?
उगाच काहीही बोलून किंवा लिहून, काहीही कृती न करणे, हे मूर्खपणाचे आहे. आता जर आपण जागे झालो नाही तर नेहमीच आपल्यावर संकट येइल.
आणि आता जसे कायदे आहेत, त्याप्रमाणे, न्यायालयीन कारवाईशिवाय शिक्षा होत नाही. पण त्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत. ते ही जर लोक करू देत नसतील, तर खरोखरच मूर्खांचे राज्य आले आहे. कोणाला वकीलपत्र घेउ न देण्यामुळे जो ऊशीर झाला, त्याला जवाबदार कोण? जसा फाशी देणयासाठी मांग हवा, तसाच शिक्षा देणारा जज आणि वकिल सुद्धा हवा, हे न कळण्याइतके दूधखुळे झालो आहोत का आपण?
जर जगाला काही न्यायप्रियता ई. दाखवायचं आहे, वगैरे कोणी म्हणत असेल, तर मात्र अगदी शिव्या तोंडावर येतात. हरामखोर लेकाचे, इथे काय जळतंय आणि तुम्हाला काय नालायकपणा सुचतोय....

Friday, April 10, 2009

election 2009 - Sushant

On http://sushantsj.blogspot.com/2009/04/election-2009.html


Election 2009 amazes for following reasons.1. NSA against varun Gandhi for the speech which Congress and BSP is giving for last 60 years.2. Finally Tytler shown door by public, a reason I should keep some hope in people’s rule3. But I am surprised to see the Vaiko’s and Karunanidhi’s statement and no political action.4. More congress and third front leaders being breaching EC rule but no media outcry.5. So many people who used to prepare flex boards, cut outs are taken out of job by EC during recession through election code of conduct.6. Sanjay Dutt - actor turn politician or terrorist turn politician ? How come mumbai police listen to the accusations ?These are just few, you can add too.


My Comments:


What's the problem with the EC being fair on the advertizing and cut outs?There's already enough mess on the roads, we do not need more pollution and waste of public money for the sake of elections. Ofcourse there will be jobs at stake for every good or bad restriction. That doesn't mean that we should do away with any sort of restrictions.I hope we also impose ban on crackers during the elections and the results. We do not need any more death causing jobs. Do we?