Saturday, May 16, 2009

एअरपोर्ट सिक्युरिटी

On article: http://kayvatelte.wordpress.com/2009/05/15/एअरपोर्ट-सिक्युरिटी

एअरपोर्ट सिक्युरिटी.
आज सकाळी मुंबईहुन नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेशभाई होता. तो सकाळी वापीहुन आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापी हुन). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणुन त्याने आपली कार आण्यायची आणि मग आधी मला पिक अप करुन एअर्पोर्ट ला जायचं . आम्हाला ड्रॉप केलं की त्याचा ड्रायव्हर गाडी माझ्या घरी पार्क करेल, आणि मग संध्याकाळी परत मुंबईला पोहोचल्यावर दिनेश भाई कार घेउन जाइल..
कसलं जबरी प्लानिंग केलंय ?? नाही कां? अहो इतका विचार जर आपल्या कामाच्या बाबतिल केला तर टर्न ओव्हर दुप्पट वाढेल. पण तसं होत नाही नां… हीच तर खरी शोकांतिका आहे. असो..
तर एअर्पोर्ट ला पोहोचल्यावर चेक इन बॅगेज टाकलं आणि आम्ही हात हलवत इकडे तिकडे फिरत होतो. दिनेश म्हणे.. प्रॉपर युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस असायला पाहिजे. पण तेच जमत नाही. जर ते जमलं तर मात्र भरपुर पैसा वाचु शकेल, एक माणुस जास्त काम करु शकेल. म्हंटलं.. अरे भाई.. जरा होश मे आओ.. आज साला तुम्हारे पास काम नही है तो आदमी को भगादोगे, बादमे जब जरुरत पडेगी तो आदमी कहांसे पैदा करोगे? ईतने स्किल्ड आदमी जो तुम्हारे पास है , दस सालोसे, उनकॊ इतनी आसानिसे छोड दोगे?? अगर ऐसा करोगे, तो इट्स द मोस्ट फुलिश डिसिजन यु विल बी टेकिंग…!
म्हंटलं दिनेश भाई , युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस जर पहायचे असतिल तर त्या मद्राशाकडे पहा.आमच्या समोरंच एक मद्रासी उभा होता. स्वच्छ पांढरा शर्ट, काळी पॅंट, गळ्यामधे एअरपोर्ट ऍथोरिटीने दिलेला आय कार्ड… चेहेऱ्यावर एक वेगळाच उर्मटपणा..ह्या मद्रासी लोकांचा चहा आणि कापी वर अगदी एकाधिकार आहे. हा फोटॊ बघा
ट्रॉली – एअरपोर्ट ऑथॉरिटी ची, ह्याचं इनव्हेस्टमेंट फक्त दोन थर्मास आणि चहाचे कप. बरं, एअरपोर्टवर आत येण्यासाठी लागणारा पास पण ह्याच्या गळ्यात लटकत आहे, म्हणजे नक्कीच ह्याने एअरपोर्ट ऑथॉरिटी च्या सिक्युरीटीचे किंवा प्रॉपर माणसाचे पाम ग्रिसिंग केलेले असावेत. जो चहा बाहेर सायकलवरचा भैय्या ( मुंबईकरांना माहिती असेल, की भल्या पहाटे कांही भैये लोकं सायकलवर चहाची किटली ठेउन चहाचा/कॉफिचा धंदा करतात) ५ रुपयात विकतो, त्याच क्वॉलिटीचा चहा हा मद्राशी भैय्या १५ रुपयात विकतो. याला म्हणतात बेस्ट युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस…असं काही तरी करा !
हे सिक्युरिटी वाले आपल्या सारख्या सामान्य प्रवाशाला किती छळतात? समजा पाण्याची जरी बाटली असली तरी पाणी पिउन दाखवा म्हणतात. बरं हे तर सोडाच, ह्यांचा हलकट पणा इथेच संपत नाही, तर लहान मुलाचं दुध असेल, तर त्याच्या आइला ते पण पिउन दाखवायला लावतात हे निर्लज्ज सिक्युरिटी वाले—
आणि मग या मद्राशाला कसा काय तो पास मिळाला असेल? कोणी त्याला परमिशन दिली असेल? म्हणजे मुंबई एअरपोर्टचे अधिकारी+ सिक्युरिटी ह्या दोघांनाही त्याने चांगले पैसे खाउ घातले असतिल म्हणुन त्याला असा एक्स्लुझिव धंदा करण्याचा परवाना मिळाला असावा एअरपोर्ट मधे.
राजकोट एअरपोर्टवरच्या ह्या सिक्युरिटी वाले तर अशा तर्हेने तपासतात, जसे कांही तुम्ही स्पेस शिपमधेच बसायला चालले आहात. लॅप टॉप असेल तर त्यांच्या कडे एक मोठा ट्रे असतो, त्या ट्रे मधे तुमचा लॅपटॉप काढुन त्या ट्रे मधे ठेवायचा. आणि रिकामी बॅग त्या एक्स रे मधुन पास करायची. असा मुर्खपणा त्यांना कोणी आणि कां करायला सांगितला आहे ते कळत नाही. तुमची लॅपटॉप्ची बॅग ही रेक्झिन ची किंवा लेदरची असते, त्या मधुन एक्स रे सरळ पास होऊ शकतात.. पण नाही.. ह्या निर्बुध्द लोकांना ते कोण सांगणार?
बरं ह्यांचे नियम एअरपोर्ट गणिक बदलतात. म्हणजे जे कांहि सिक्युरिटी च्या नावाखाली राजकोटला करतात, ते नागपुरला करतात असे नाही , किंवा अहमदाबादला जे हॅंड बॅगेज मधे चालतं ते भुजला चालेल असं नाही. प्रत्येक ठिकाणचा तो ठोंब्या सिक्युरिटीवाला आपल्याला वाटेल तसे नियम बनवतो.
परवाचीच गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात मी नागपुरला आलो होतो . इथुन परत जातांना आईने मला आवडतं म्हणून कच्च्या फणसाचं आणी कैरी चं मिक्स लोणचं दिलं होतं. मी विचार केला, की जर हे चेक इन बॅगेज मधे टाकलं, तर कदाचित बाटली फुटेल. म्हणुन ते हॅंड बॅगेज मधे ठेवलं. सिक्युरिटीच्या वेळी त्या माणसानी अडवलं मला, म्हणे आप नहीं ले जा सकते ये चिज? म्हंट्लं क्यो? तर म्हणे इसमे तेल है, और तेल अलाउड नही है फ्लाइटमे. मी त्याला सांगुन पाहिलं की मुंबईहुन येतांना मी एक मुंबईचं लोणचं इथे आणलं होतं.. तर म्हणे वहांका कानुन अलग है.. !!!
या मुर्ख आणि अशिक्षित लोकांशी जास्त वाद घालण्यात काहिंच फायदा नसतो. बरेचसे लोकं मग आपल्या हॅंडबॅगेजमधले, शेव्हिंग क्रिम्स, डिओडॊरंट्स, आणि इतर तरल पदार्थ काढुन तिथे टाकुन देतात. मला तर अगदी दाट संशय आहे, की हे पॅसेंजर्स कडुन काढुन घेतलेले सामान नंतर हा सिक्युरिटी स्टाफ वाटुन घेत असेल. नाही तर यांची लायकी आहे का फ्रेंच पर्फ्युम वापरायची? नक्कीच एखाद्या पॅसेंजरचा ढापलेला असेल तो…..!
एखादा पॅसेंजर जर इटरनॅशनल फ्लाइटने आला असेल तर त्याच्या हॅंडबॅगेजमधंल बरंच सामान हे लोकं सिक्युरिटीच्या नियमाखाली काढुन घेतात. त्यांचे खास बकरे असतात हे बाहेरुन आलेले . तो पॅसेंजर मग अगदी जीव तोडुन सांगत असतो, भैय्या , मै ये अमेरिकासे हँडबॅगेज मे लाया है. इसमे कुछ नहीं है.. पण ह्यांच्या चेहेऱ्यावरची रेष पण हलेल तर शपथ! हे म्हणतात, इंडियामे नही चलता है ये हॅंड बॅगेज मे.आणि मग त्याला सांगितलं जाते की आप ये चेक इन बॅगेजमे डाल दो.. बरेच लोकं मग ते सगळं सामान चरफर्डत तिथेच डस्ट बिन मधे टाकतात.. भिकाऱ्यांची जशी कटोरी तशी या सिक्युरिटी वाल्यांचं भिक मागायचं मोठ्ठं भांडं म्हणजे ती मोठ्ठी डस्ट बिन.. त्याला खरंच डस्ट बिन म्हणायचं कां?? बरं कस्टम मधे काय होतं त्यावर एक वेगळा लेख होईल.
जगामधे कांही लोकं असे आहेत की ज्यांचा मी अगदी मनापासुन तिरस्कार करतो, त्यापैकी हे खाकी कपडे वाले! बरं तुम्हाला आणि आम्हाला इतका त्रास देणारे हे लोकं , एखादा मंत्री आला, की त्याला सरळ सॅलुट करुन जाउ देतात. मग तेंव्हा सिक्युरिटीचं काय होतं? बरेचदा, लहान एअरपोर्टवर त्या मंत्र्या बरोबर त्याचे चमचे अगदी आतपर्यंत येतात त्याला सोडायला.. ते कसं चालतं? आणि कुठल्या नियमात बसतं ते??
गुजराथ मधे एक अंजार नावाची जागा आहे. इथे तलवारी , चाकू इत्यादी वस्तु तयार होतात. त्याला सुंदरशी पितळेची मुठ असते, छान लाल मॅन असतं.. मी एकदा सहज म्हणुन तलवारी घेतल्या दोन विकत, म्हंट्लं, की छान शो पिस आहेत. चेक इन ला टाकलं बॅगेज, तर तिथे मला म्हणतो, अलाउड नहीं है.. मला जरा रागंच आला, त्याला म्हणालो, ऐसा कहां लिखा है की चेक इन बॅगेजमे तलवार अलाउड नही ं है? मोठ्या मुश्किलिने सोडलं त्याने मला.
कांही वर्षांपुर्वी, अजुन एक फार्स होता इंडियन एअरलाइन्स चा. तुमचं चेक इन केलेलं बॅगेज, ते लोकं बाहेर एका रांगेत मांडुन ठेवायचे नागपुर एअरपोर्ट ला, आणि मग तुम्ही सिक्युरिटी मधुन पास झाल्यावर ते तुम्ही आयडॆंटीफाय करायचं, मग एक सिक्युरिटीवाला त्या टॅग वर क्रॉस करेल आणि मग ते बॅगेज विमानात चढवले जाईल. हा फार्स फक्त इंडियन एअरलाइन्सचे लोकंच करायचे, जेट ने तुम्ही जात असाल ,तर या प्रोसिजरची गरज नसायची?
तुमचे अनुभव .. एअरपोर्ट सिक्युरिटीच्या बाबतितले तुम्ही इथे कॉमेंट्स मधे पोस्ट करु शकता..
मला नेहेमी पडणारा प्रशन.. जेट आणी इतर एअरलाइन्सची सिक्युरिटी वेगळी कशी?? आणि कां? जाउ द्या.. आलिया भोगासी असावे सादरं, चित्ती असु द्यावे समाधानं!


My Comments:


महेंद्र,
मला वाटतं, तुमचा दृष्टीकोन बराच चुकीचा आहे. अनेक ठिकाणी अजाणतेपणी तुम्ही सिक्युरिटी स्टाफचा दुस्वास करीत आहात.
काही ठिकाणी अपवादात्मक असे लोकं असतील (उदा. अंजार चा अनुभव) जिथे काहीबाही सांगुन वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण आता अधिकाधीक ठिकाणी नियम सारखे आहेत. काही नियम नुकतेच बदललेले आहेत. ते का याबद्दलही अनेक बातम्या दिल्या होत्या. जे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्यांना शिव्या घालून काय साध्य होईल ?
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवासापूर्वी सगळे नियम माहिती करून घेणे. कारण यात वारंवार बदल होउ शकतात. जे नियम बदलतात त्यात काही वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल की काही ठिकाणी वेगळे नियम काही ठिकाणी वेगळे….. कारण, कर्मचार्‍यांनाच सुचना व प्रशिक्षण देण्याची वेळ व पद्धत व बदलाबत प्रवाश्यांना माहिती नसणे, ई.
लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक व धातूच्या वस्तू बाजूला का काढाव्या, हे एव्हाना कळलं असावं… नसेल तर इमेल वर आपण संपर्क करूयात.
द्रव वस्तू अगदी लहान मुलांसाठी असल्या तरी त्याची खात्री करून घेणे केव्हाही योग्य. ’लहान मुलाचं दुध असेल, तर त्याच्या आइला ते पण पिउन दाखवायला लावतात’ तर यात आईला कशाबद्दल लाज वाटली पाहिजे? आई तर नेहमी तापमान वगैरे तपासून पहात असतेच, तर मग थोडं प्यावं लागलं तर त्यात वाईट काय?
कस्टम हे सिक्य़ुरिटीपेक्षा वेगळे आहेत, आणि मला जास्त अनुभव नसल्यामुळे कदाचित आपलं म्हणण योग्य असेल.
सिक्युरिटीचे नियम मला योग्य वाटतात आणि सगळ्यांनी त्याबद्दल माहिती ठेवावी व पाळावेत. शेवटी सर्वसामान्य माणसाने नियम चुकविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला, तर त्याचा फायदा वाइट लोकं घेऊ शकतात हे समजून योग्य रितीने वागावं.