Tuesday, April 21, 2009

खटला सुरू झाला - Dilip Khapre

On article : http://www.khapre.org/blog/marathi/2009/04/blog-post_19.aspx

अखेर अजमल कसाबचा खटला सुरू झाला आहे. ज्या माणसाने गोळीबार करताना मिडीयाने पुन्हा पुन्हा दाखविले, माणसांचे मुडदे पाडताना करोडो लोकांनी त्याला पाहिले अशा गुन्हेगारावर खटला चालू आहे. काय लोकशाहीची दुर्दशा ! न्यायालयात जेव्हा खुनाचा खटला चालू असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्‍या साक्षीदारावर विश्वास ठेउन कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देते, आणि इथे तर T.V. वर प्रत्यक्ष देशाने पाहिलेले असताना त्या कसाबवर खटला चालवावा म्हणजे काय?
आता त्याला न्यायालय सर्व संधी देणार. वर्तमानपत्रात त्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर अंदाज तरी करता येईल काय, किती खर्च येत असेल ते. आपण उलटा विचार करू यात असे पाकिस्तानात घडले असते तर काय पाकिस्तानने लाड पुरवले असते काय? अरे कसला खटला चालवता त्याला दाखवा तो कसा गोळीबार करतो ते आणि हाच पुरावा ग्राह्य धरून द्या ना त्याला जाहीर जाहीर फाशी, मग कोणीही माईचा लाल यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. द्या त्या अफझल गुरूला जनतेच्या हवाली करून, मग बघा जनता त्याचा काय न्याय करते ते.
कसाब काय तक्रार करतो, जग काय म्हणेल, पाकिस्तानचे संबंध कसे राहतील याच काय विचार करायचा? बंदूक चालवताना त्याने विचार केला होता? त्याने किती कुटुंबांना निराधार केले आहे, त्यांनी काय करावे. काय भारताची घटना आहे, ज्याने खुले आम, ज्यांचा कुठलाही गुन्हा किंवा दोष नसताना, दीडेकशे माणसांचे मुडदे पाडले, जे सर्व भारताने पाहिले, त्याला कायदा संरक्षण देतो, न्यायाची संधी देतो आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेतो, मोठी चेष्टा आहे.
आपण जगाला काय दाखवायचे की, आम्ही किती न्यायप्रिय आहोत, भले मग आमच्या निष्पाप जनतेवर कोणीही कसाही गोळीबार करावा. काय न्याय मिळणार आहे त्या कर्तबगार अधिकार्‍यांना, काय न्याय मिळणार आहे त्या कुटुंबीयांना, आपण त्यांना न्याय नाकारतो आहोत, त्या कसाबाला न्याय देताना याचे भान सर्वजण विसरलेत.
लोकसभेला मते मागणारे, जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत, पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार आहे.



My comment:



दिलिप,
मला वाटते की तुम्ही स्वात मधे जाऊन रहाण्यास अत्यंत लायक आहात. तिथे ही विशेष कोणाचे ऐकून न घेता शिक्षा करत सूटतात.
होय, कसावला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. पण, जर तुम्ही ज्या देशाचे कायदे करण्यात भाग घेत नसाल, तर असा घोळ कायमच घातला जाईल.
करा ना कायदा की कसावला लोकांच्यात फेकून देण्यात यावे. जाहीर फाशी द्यावी. मी तुम्हाला पूर्ण पाठींबा देइन. पोलिस किंवा राजकारण्यांकडून तुम्ही नक्की काय अपेक्षा करताय? आणि नेहमी काय करत रहाव अस म्हणताय ?
उगाच काहीही बोलून किंवा लिहून, काहीही कृती न करणे, हे मूर्खपणाचे आहे. आता जर आपण जागे झालो नाही तर नेहमीच आपल्यावर संकट येइल.
आणि आता जसे कायदे आहेत, त्याप्रमाणे, न्यायालयीन कारवाईशिवाय शिक्षा होत नाही. पण त्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत. ते ही जर लोक करू देत नसतील, तर खरोखरच मूर्खांचे राज्य आले आहे. कोणाला वकीलपत्र घेउ न देण्यामुळे जो ऊशीर झाला, त्याला जवाबदार कोण? जसा फाशी देणयासाठी मांग हवा, तसाच शिक्षा देणारा जज आणि वकिल सुद्धा हवा, हे न कळण्याइतके दूधखुळे झालो आहोत का आपण?
जर जगाला काही न्यायप्रियता ई. दाखवायचं आहे, वगैरे कोणी म्हणत असेल, तर मात्र अगदी शिव्या तोंडावर येतात. हरामखोर लेकाचे, इथे काय जळतंय आणि तुम्हाला काय नालायकपणा सुचतोय....

Friday, April 10, 2009

election 2009 - Sushant

On http://sushantsj.blogspot.com/2009/04/election-2009.html


Election 2009 amazes for following reasons.1. NSA against varun Gandhi for the speech which Congress and BSP is giving for last 60 years.2. Finally Tytler shown door by public, a reason I should keep some hope in people’s rule3. But I am surprised to see the Vaiko’s and Karunanidhi’s statement and no political action.4. More congress and third front leaders being breaching EC rule but no media outcry.5. So many people who used to prepare flex boards, cut outs are taken out of job by EC during recession through election code of conduct.6. Sanjay Dutt - actor turn politician or terrorist turn politician ? How come mumbai police listen to the accusations ?These are just few, you can add too.


My Comments:


What's the problem with the EC being fair on the advertizing and cut outs?There's already enough mess on the roads, we do not need more pollution and waste of public money for the sake of elections. Ofcourse there will be jobs at stake for every good or bad restriction. That doesn't mean that we should do away with any sort of restrictions.I hope we also impose ban on crackers during the elections and the results. We do not need any more death causing jobs. Do we?